काम करणाऱ्याला मत द्या, नाचणाऱ्याला नका देऊ ; केजरीवालांची मनोज तिवारींवर टीका

manoj tiwari and kejriwal

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘मनोज तिवारी गेल्या पाच वर्षांपासून मतदार संघातून गायब आहेत. पाच वर्षात लोक त्यांना भेटू शकले नाहीत. त्यांनी एकही शाळा आणली नाही. रस्ते बांधले नाहीत किंवा ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनची सुविधा उपलब्ध करुन दिली नाही. त्यामुळे काम करणाऱ्याला मत द्या, नाचणाऱ्याला देऊ नका,अशा शब्दात आम आदमी पार्टीचे (आप) नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्तर-पूर्व दिल्लीतील मतदार संघातील भाजपचे उमेदवार तथा अभिनेते मनोज तिवारी यांच्यावर टीका केली आहे.

 

 

शुक्रवारी उत्तर-पूर्व दिल्लीतील मतदार संघातील आपचे उमेदवार दिलीप पांडे यांच्या प्रचारार्थ रोड शो केला. यावेळी त्यांनी भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी यांच्यावर निशाणा साधला. या रोड शो दरम्यान जनतेला संबोधिक करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, दिलीप पांडे तुमच्यासाठी नाचू शकणार नाहीत. मात्र, तुमच्या भागात काम जरुर करतील. मनोज तिवारी चांगले नाचतात. दिलीप पांडे यांना नाचता येत नाही, मात्र काम करता येते. त्यामुळे काम करणाऱ्याला मत द्या, नाचणाऱ्याला देऊ नका. आता मतदान करण्यासाठी जाताना विचार करा आणि तुमच्यासोबत राहून जो काम करु शकेल त्याला मत द्या. दरम्यान, उत्तर-पूर्व दिल्लीतील मतदार संघातून आपचे उमेदवार दिलीप पांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी आणि काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्षा शीला दीक्षित निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.

Add Comment

Protected Content