चोरी केली नाही, मग चौकशीचे आदेश द्याल का? : राहुल गांधी

raga namo

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राफेलच्या फायली गायब होतात अर्थातच त्यात सत्य दडलेच होते. पंतप्रधान रफाल कराराव्यतिरिक्त समांतर चर्चा करत होते, असा त्यामध्ये उल्लेख होता. त्यामुळे, रफालची कागदपत्रे गायब होण्याची चौकशी तर कराच त्यासोबत पंतप्रधानांविरुद्ध कारवाई सुद्धा करा असे, म्हणत राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केले आहे. तसेच तुम्ही चोरी केली नाही, तर चौकशीचे आदेश द्या, असेही राहुल यांनी मोदींना म्हटले आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनिल अंबानी यांना 20 हजार कोटींचा करार मिळवून दिला असे आरोप राहुल गांधींनी लावले. सोबतच, माझ्या विरोधात कुठलीही चौकशी होत असेल तर मी त्यास सामोरे जाईल कारण मी काहीही केलेले नाही. मग, पंतप्रधानांना चौकशीची भीती का वाटते. ते खरंच निर्दोष असतील तर त्यांनी चौकशीला सामोरे जावे सत्य समोर येईल, असेही राहुल गांधी म्हणाले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. राफेल प्रकरणातील कागदोपत्रांवर संरक्षणमंत्र्यांच्या नावाचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. राफेलच्या फाईलींमध्ये सगळ्या बाबी स्पष्ट दिसत आहेत. मग, जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीच आहे. जर, याप्रकरणात मोदी दोषी नसतील, तर ते चौकशी करण्याचे आदेश का देत नाहीत, असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला आहे. राफेल करारासंदर्भात झालेल्या घोटाळ्यांच्या आरोपानंतर काँग्रेसकडून जेपीसीची मागणी करण्यात आली होती. मात्र, भाजपाच्या त्या चर्चेतून पळ काढला. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदीही गप्प का आहेत. मी देशाचा चौकीदार आहे, मी चोरी नाही केली असे ठामपणे का सांगत नाही. मग, मोदींकडून चौकशीचे आदेश का देण्यात येत नाहीत, असा प्रश्नही राहुल यांनी विचारला आहे. राफेलप्रकरणात एक बाब स्पष्ट आहे. पंतप्रधानांनी व्यक्तिगत हेतूने अनिल अंबानींना राफेलचे कंत्राट दिले असून अंबानींच्या खिशात 30 हजार कोटी रुपये टाकल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

Add Comment

Protected Content