मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | फसवणुकीच्या वाढत्या संख्येवर नजर ठेवून डिस्कॉम्सने मीडिया जागरूकता मोहिम सुरू केली आहे. त्यात वीज बिल भरण्याबाबत काही सल्ले देण्यात आले आहेत. व्हेरिफाईड ॲप्सवर वीज बिल भरणे, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड तपशील कुठेही देऊ नये. संशयास्पद लिंक्सवर क्लिक करणे टाळा असे सल्ले देण्यात आले आहेत.
हे घोटाळे एका शहरापुरते मर्यादित नाहीत. हे घोटाळेबाज सर्वत्र समान डावपेच वापरत आहेत. ते थकीत पेमेंटचा दावा करणारे मॅसेज पाठवतात आणि लोकांकडून संशयास्पद लिंकवर क्लिक करण्यास किंवा अपरिचित नंबरवर कॉल करण्यास उद्युक्त करतात. या लिंक्स अनेकदा मालवेअर-ग्रस्त वेबसाइट्सकडे लोकांना नेतात. अलीकडेच दिल्लीतील एका डॉक्टरला याचा फटका बसला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्याने वीज बिल भरण्यासाठी बनावट लिंकवर क्लिक केले आणि त्याची 6 लाख रुपयांची फसवणूक केली.
बीएसईएसच्या अधिकाऱ्याने सांगितले की, वीज बिल भरताना ग्राहकांनी सतर्क राहणे आणि सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. केवळ बीएसईएस-अधिकृत प्लॅटफॉर्म वापरणे आवश्यक आहे. अधिकारी पुढे म्हणाले, “आमचे अधिकारी ग्राहकांना त्यांच्या बँक किंवा क्रेडिट/डेबिट कार्ड तपशील, सीव्हीव्ही क्रमांक किंवा ओटीपी कधीही विचारणार नाहीत.