चोपडा (प्रतिनिधी) मुलांना करियर निवडण्यासाठी स्वातंत्र्य दिले पाहिजे. पालकांनी मार्गदर्शन जरूर करावे. परंतू आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादू नये, असे मत महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला,शास्र व वाणिज्य महाविद्यालय संस्थेचे अध्यक्ष अॅड.संदीप सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. ते १२ वी तील गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला,शास्र व वाणिज्य महाविद्यालय,चोपडा येथील इयत्ता १२ वी वर्गातील गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून पुढे बोलतांना अॅड.संदीप पाटील म्हणाले की, विद्यार्थी केंद्रबिंदू मानून संस्था व महाविद्यालय सतत नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेत असून चोपड्याचा विद्यार्थी हा इतरांच्या तुलनेत कमी पडणार नाही,या साठी प्रयत्नरत असल्याचे सांगितले. तसेच गुणवंत विद्यार्थी पालक व शिक्षक यांचेहि त्यांनी अभिनंदन केले. तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी महाविद्यालय व संस्था मिळून विद्यार्थ्यांचा रचनात्मक विकास करन्यासाठी करत असलेले उपक्रमाबाबत उपस्थितांना अवगत केले.
विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची परंपरा कायम राखत सरासरी ९१.५५%एवढी मजल मारली आहे म्हणून मान्यवरांच्या हस्ते शाखानिहाय यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यात विज्ञान शाखेचा निकाल ९६.८५ टक्के लागला असून पाटील दुर्गेश नरेश याने ९१.२३ टक्के गुण प्राप्त करत प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. तर गाडिलोहार जयेश बापू याने ८९.८४ टक्के मिळवत दुसरे स्थान पटकविले. पाटील गौरव संजय याने ८९.०७ टक्के प्राप्त केल्याने त्याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. वाणिज्य शाखेचा। निकाल ९५.०४ टक्के लागला असून अग्रवाल ख़ुशी रविंद्रला ९१.३८ टक्के, अग्रवाल पलक मनोज ८९.५३ टक्के, पाटील चेतना छोटू ८६.१५ अत्क्के,गुजराथी राधा अनिल ८६.१५ टक्के गुण मिळवत अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.
कला शाखेने हि ७७.०४ टक्क्यापर्यंत मजल मारत गुणवत्तेचा आलेख चढता ठेवला आहे. पाटीलअक्षय रवींद्र ८०.०० टक्के ,ठाकरे भाग्यश्री सुनिल,७४.६१,बोरसे कविता बाबुलाल ७४.४६ टक्के गुण मिळवत अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेत. एम.सी.व्ही.सी.अर्थात किमान कौशल्य विभागातील इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजि विभागातून सोनगिरे अशोक धनराज ६५.३८ टक्के, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजि विभागातून पाटील योगराज अशोक ७१.५२ टक्के तर अकौंटिंग विभागातून शे.मुझाहीद शे.आसिफ यांना ६१.३८ टक्के गुण मिळविले आहेत.
या कार्यक्रमाला सचिव-डॉ.स्मिता संदीप पाटील, संचालक श्री.सुरेश सीताराम पाटील,श्री.राजाराम पाटील,श्री.के.डी.चौधरी,संजीव बाविस्कर,रजिस्टार डी.एम.पाटील,उपप्राचार्य प्रा.एम.बी.हांडे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.संदीप भास्कर पाटील यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रा.बी.एस.हळपे यांनी मानले. यावेळी पर्यवेक्षक प्रा.व्ही.वाय.पाटील, प्रा.एस.पी.पाटील, प्रा.ए.एन.बोरसे, प्रा.पी.एस.पडवी, प्रा.टी. एस.पिंजारी, प्रा.आर.इ.लांडगे, प्रा.वाय.एन.पाटील, प्रा.पी.एल.पाटील, प्रा.प्रशांत पाटील, प्रा.समाधान पाटील, प्रा.आर.आर.पवार, प्रा.आर.एस.निकम, प्रा.अभिजित पाटील, निलेश सोनवणे आदींसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.