जामनेर प्रतिनिधी । येथील ज्ञानगंगा कनिष्ठ महाविद्यालयात १३ ऑगस्ट रोजी ‘महाराष्ट्रावर बोलू काही’ या युवाजागर महाराष्ट्र शासन निर्णयानुसार “युवासंसद” हा कार्यक्रम महाविद्यालयात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य आर. जे.सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शिंदे सर व आय.एम.आर.कॉलेजचे प्राचार्य किशोर पाटील, प्रा.सुवर्णा पांढरे, शितल पाटील, राहुल महाजन, रुपाली पाटील हे उपस्थित होते.
महाविद्यालय स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक सतिष संजय सुरवाडे. द्वितीय क्रमांक, वैष्णवी बाबुराव शिंदे तर तृतीय क्रमांक, देवश्री किरण चौधरी हिने पटकावला. प्रमुख पाहुणे यांनी परिक्षकाची भूमिका पार पाडली. शेवटी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य सोनवणे यांनी उत्कृष्ठ वक्ता बाबत मार्गदर्शन केले. प्राध्यापक विनोद बी. सपकाळ यांनी प्रास्ताविक केले तर आभार प्राध्यापक नंदू पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर वृंद व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.