Home Cities यावल ज्ञानेश्वर तायडे यांची काँग्रेस सेवा फाऊंडेशनच्या जिल्हा सचिवपदी निवड

ज्ञानेश्वर तायडे यांची काँग्रेस सेवा फाऊंडेशनच्या जिल्हा सचिवपदी निवड


यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चिखली बु॥ येथील ज्ञानेश्वर सोपान तायडे यांची काँग्रेस सेवा फाऊंडेशनच्या जिल्हा सचिवपदी यांची निवड करण्यात आली आहे.  जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल यांनी शिफारस दिल्यानुसार कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल यांनी  नियुक्तीपत्र देवून निवड केली आहे.

ज्ञानेश्वर तायडे यांच्या निवडीबद्दल काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परिषद गटनेते  प्रभाकर सोनवणे, जिल्हा सरचिटणीस  अजबराव पाटील, युवानेते धनंजय चौधरी, पंचायत समिती गटनेते शेखर पाटील, कोरपावलीचे सामाजीक कार्यकर्ते मुक्तार पटेल, तालुका महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा विवरे ग्रापच्या सदस्या  मनीषा पाचपांडे, जळगाव जिल्हा अनुसुचित जाती विभाग काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षा चंद्रकलाताई इंगळे, काँग्रेस सेवा फाऊंडेशनच्या जिल्ह उपाध्यक्षा मीनाक्षी जावरे, मनीषा पाटील, जिल्हा सचिव काँग्रेस अनिशा पटेल, यावल तालुका अध्यक्ष अभय महाजन, एरंडोल तालुकाध्यक्ष जुनेद पटेल, भुसावळ तालुकाध्यक्ष इज्जू पिंजारी, शहराध्यक्ष नईम शेख, तालुका उपाध्यक्ष अय्युब खान आदींनी अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound