जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्री संत ज्ञानेश्वर चौक मेहरूण येथे २१ ते २८ नोव्हेंबर दरम्यान ‘श्री ज्ञानेश्वरी पारायण’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सालाबादा प्रमाणे या कार्यक्रमाचे संयोजन मा. नगरसेवक प्रशांत भाऊ नाईक केला आहे.कार्यक्रमाची सुरुवात महापौर नितीन लढ्ढा व अलका लढ्ढा यांच्या हस्ते श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पूजन करून करण्यात आले.
ज्ञानेश्वरी पारायण ह भ प पंढरीनाथ महाराज कोर्हाळा बाजार यांच्या मुखातून होणार आहे.रोज रात्री हरिनाम सहकीर्तन आठ ते दहा या वेळेत होणार आहे सांगता समारोप गुरुवार दिनांक 28 नोवेंबर 2024 रोजी होणार आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान मा. नगरसेवक प्रशांत भाऊ नाईक यांनी केले आहे.