जामनेरात उद्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम

जामनेर प्रतिनिधी । दिवाळी निमित्त जामनेरकर रसिक श्रोत्यांसाठी आनंदयात्री परिवारातर्फे उद्या रविवार (दि.७) रोजी सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत नवीन पंचायत समिती आवारात न्यू इंग्लिश स्कूल जवळ, जामनेर येथे “दिवाळी पहाट”या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान आनंदयात्री परिवाराचे अध्यक्ष डॉ. अमोल शेठ यांनी केले आहे. आनंदयात्री परिवारातर्फे आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत परिवाराचे सचिव पत्रकार सुहास चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, डॉ. चंद्रशेखर पाटील ,डॉ. आशिष महाजन,बंडू जोशी, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांना माहिती देताना आनंदयात्री परिवाराचे अध्यक्ष डॉ. अमोल शेठ म्हणाले की शहराचा सांस्कृतिक चळवळीचा ईतिहास पुनरुज्जीवीत व्हावा यासाठी आनंदयात्री परिवारातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन वर्षभरामध्ये केले जाते. मात्र कोरोना महामारी मुळे या चळवळीला ब्रेक बसला होता .परंतु यावर्षी कोरोना चे वातावरण निवळल्यामुळे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात कलर्स मराठी वरील पर्व 3 रे मधील प्रथितयश कलावंत प्रसिद्ध गायक प्रशांत काळुंद्रेकर व गायिका सौ. मेघना काळुंद्रेकर यांच्या सुर नवा ध्यास नवा अशा सदाबहार भक्ती व भावगीतांची सुरेल मैफल चा लाभ रसिकांना घेता येणार आहे .अशी माहिती डॉ. सेठ यांनी दिली. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

याचवेळी आनंदयात्री परिवाराचे सचिव सुहास चौधरी हे आपले विचार मांडताना म्हणाले की, जामनेर चा सांस्कृतिक वारसा ह्रास होत चालला आहे. त्यामुळे तरुण पिढी कुठेतरी भरकटलेल्या सारखी होत आहे. सांस्कृतिक चळवळ जिवंत राहिल्यास चांगल्या विचारांची मेजवानी या कार्यक्रमांमधून मिळते. म्हणून हि चळवळ पुन्हा उभी करण्यासाठी आनंदयात्री परिवारा चे प्रयत्नअसून यानंतर वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आनंदयात्री परिवारा तर्फे केले जातील असेही ते म्हणाले.

 

 

Protected Content