रावेर प्रतिनिधी | दिवाळीच्या तोंडावर तहसिलदार उषाराणी देवगुणेच्या पाठपुराव्यांमुळे तालुक्यातील गरीब निराधार विधवा महिलांचे पेशंन त्यांच्या खात्यावर आज वर्ग करण्यात आले आहे.
यामध्ये केंद्राचे अनुदान यायला उशीर झाला असून इंदरा गांधी योजनेच्या लाभार्थांना फक्त जुलै महिन्याचे अनुदान प्राप्त झाले आहे. यामुळे तालुका भरातील गरीबांची दिवाली गोळ होणार आहे. विविध योजनेचे अनुदान जुलै पासुन प्रलंबित आहे. येथे रोज पेंशन धारक चकरा मारत होते. परंतु दिवाळीच्या तोंडावर तहसिलदार उषाराणी देवगुणेच्या पाठपुराव्यांमुळे केंद्र सरकारचे एक महीना तर राज्य सरकारचे दोन महिन्यांचे अनुदान प्राप्त झाले असून रात्र-दिवस याद्या बिल तयार करून आज तालुक्यातील पेंशन धारकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. यामुळे गरीब निराधार वृध्द विधवा महिलां मधुन समाधान व्यक्त केले जात आहे. सजंय गांधी नायब तहसिलदार सजंय तायडे अव्वल कारकुन शिवकुमार लोळपे, एस.एफ.तडवी, पुरषोत्तम महाजन यांनी बिल तयार करण्यावर काम केले.
या लाभार्थांन साठी आले आहे अनुदान
सजंय गांधीत येणाऱ्या सर्व जनरलसाठी दोन महीन्यांचे जुलै ऑगस्ट अनुदान प्राप्त झाले आहे. तसेच सजंय गांधी निराधार मध्ये एससी समाजाच्या लाभार्थांसाठी जुलै ऑगस्ट सप्टेंबर तिन महिन्यांचे अनुदाना प्राप्त झाले आहे.सजंय गांधी निराधार एसटी लाभार्थांसाठी जुलै या एक महिन्यांचे अनुदान आले आहे.श्रावण बाळ योजनेतील जनरल व एससी लाभार्थांसाठी जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तिन महिन्यांचे अनुदान प्राप्त झाले आहे. तर श्रावन बाळ एसटीच्या लाभार्थांचे जुलै या एक महिन्याचे अनुदान प्राप्त झाले आहे. तर केंद्र सरकार कडून येणारे इंदरा गांधी योजनेच्या अपंग/विधवा/वृद्धपकाळ यांचे जुलै या एक महीन्यांचे अनुदान रावेर तहसील कार्यालयाला प्राप्त झाले असून आज सर्व लाभार्थांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.