जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कलावंतांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी म्हणून राज्याचे ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या शिफारसीने ४ जून २०२३ रोजी कलावंतांना हाताला काम मिळावे यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांमधून कलाकारांना “शाश्वत विकासाची ध्येय” या विषयांतर्गत प्रचार प्रसिद्धीच्या माध्यमातून जाणीव जागृती करणेसाठीची कामे दिली होती.
परंतु कलावंतांना निधी मिळाला असताना जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने यांनी निधी उपलब्ध असून वेळीच निधीची मागणी न करता कलावंतांना वारंवार फिरवले. नंतर मागणी करत असताना तांत्रिक मान्यता प्रस्ताव सोबत दिला नाही. तसेच या पथनाट्य सादरीकरण संदर्भातील शासन निर्णय संपण्याची अंतिम मुदत जवळ आल्यावर त्यांनी कामासंदर्भात कलावंतांची मीटिंग घेऊन काम देण्याचे आश्वासन दिले. परंतु मुदत संपण्याची त्यांनी वाट पाहिली आणि १४ ऑक्टोंबर रोजी मुदत संपल्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी यानी नाशिक विभागीय कार्यालयाकडून तांत्रिक मान्यता प्रस्थापितांनी सदर संस्थांची मुदत संपल्यामुळे तांत्रिक मान्यता देता येत नाही. असा उल्लेख करून तांत्रिक मान्यता मागवली तरी सर्वांनी जिल्हाधिकारी यांना विनंती केली की, सध्या आमच्या संस्थेची मुदत वाढ मिळेलपर्यंत या कामासाठी वाट पाहावी लागणार आहे. तरी आगामी काळात लोकसभेचे निवडणूक पाहता आम्हा संस्थांना मागच्या कालावधीमध्ये काम मिळावं जेणेकरून आम्हा कलावंतांना बेरोजगारांना रोजगार मिळेल तरी आपल्या स्तरावरुन श्री मिलिंद दुसाने साहेब यांना संस्थाना काम देणेविषयी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कलावंताना दिला दिला आहे. याप्रसंगी विनोद ढगे, विशाल जाधव, भूषण लाडवंजारी, संजय बडगुजर, दीपक पाटील, शिवाजी पाटील, नरेंद्र पाटील, योगेश लांबोळे, संतोष सराफ, रघुनाथ बाविस्कर व पुरुषोत्तम सूर्यवंशी यांच्यासह आदी कलावंत उपस्थित होते.