चाळीसगाव प्रतिनिधी । अपंग विकास बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने राज्यस्तरीय दिव्यांग विवाह परिचय मेळाव्याचे आयोजन 7 जून 2019 रोजी आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याचे उद्घाटन नवनिर्वाचित खासदार उन्मेश पाटील यांच्याहस्ते होणार आहे.
अपंग विकास बहुउद्देशीय संस्थाही दिव्यांग व्यक्तीच्या जीवनात बदल घडविण्यासाठी सतत प्रयत्नशिल आहे. गेल्या अनेक वर्षापासून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी विविध उपक्रम घेत राहते. अश्याच पध्दतीने चाळीसगाव शहरातील सिंधी हॉल, घाटे पेट्रोलपंपाच्या बाजूला, रेल्वे स्टेशन जवळील सिंधी हॉलमध्ये 7 जून रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास राज्यस्तरीय दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे. तरी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन स्वयंदिप परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.