पाचोरा प्रतीनिधी : शहरातील समस्त दिव्यांग सेना बांधवानी आज ०१ मे २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता आमदार किशोर पाटील यांना आपल्या अडी-अडचणी आणि समस्या निवारण करण्यासाठी लेखी निवेदन देण्यात आले आहे.
आमदार किशोर पाटील यांनी दिव्यांग बांधवाच्या समस्या-अडचणी समजून घेतल्या आहेत. त्यावर गांभीर्याने दखल घेतील. तसेच पाचोरा नगरपरिषद क्षेत्रातील दिव्यांग सेना बांधवासाठी ५% राखीव निधी ठेवण्याबाबत दि. ०६ सप्टेंबर २०१९ रोजी तातडीने बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे अभिवचन दिले. तसेच भविष्यात देखील आपल्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव आपल्या पाठीशी आहे. आपणास मदत करणे हे माझे कर्तव्य आहे. असे देखील यावेळी बैठकीत नमूद केले. उपस्थित सर्व दिव्यांग बांधवानी आनंद व्यक्त केला. आमदार महोदयांचे आभार मानले. भविष्यातील यशोकामना व्यक्त केल्या. यावेळी गणेश पाटील, शरद पाटे, किशोर बारवकर, भर खंडेलवाल, पप्पू राजपुत, राजेश पाटील व दिव्यांग सेनेचे कार्यकर्ते बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिव्यांग बांधवासाठी ५% राखीव निधीचे नियोजन : आ. किशोर पाटील
6 years ago
No Comments