जळगाव (प्रतिनिधी) शहरातील गणपती नगर, गणेश कालनी परिसरासह अनेक भागात आज महापालिकेकडून पाणीपुरवठा दुषित झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. दरम्यान, नागरिकांनी दुषित पाणी बाटल्यांमध्ये भरुन त्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करीत महापालिका प्रशासनाबाबत संताप व्यक्त केला.
आज मंगळवारी महापालिकेकडून करण्यात आलेल्या पाणीपुरवठ्यातून शहरातील अनेक भागात दुषित पाणी आल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्यात. शहरातील उच्चभू्र परीसर मानल्या जाणाऱ्या गणपती नगर परिसरातील अनेक घरात दुषित पाणीपुरवठा झाला. नागरिकांनी हे पाणी बाटल्यांमध्ये भरुन त्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करीत महापालिका प्रशासनाबाबत संताप व्यक्त केला. गढूळ व दुगधीयुक्त पाणी असल्याची माहीती देखील परिसरातील नगरिकांनी दिली आहे. गणपतीनगरसह गणेश कालनी भागातील गंधव कालनी तसेच एम.जे. कालेज परिसरातील आनंद हौसिंग सोसायटीमधील काही घरांमध्ये देखिल दुषित पाणीपुरवठा झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे केल्यात. ऐन उन्हाळातच संपूण जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट असतांना दुषित पाणी पुरवठा झाल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तर काही ठिकाणी गटारीचे बांधकाम करतांना पाईप फुटले आहेत. त्यामुळे हा दुषित पाणी पुरवठा होत असल्याचे कळते.