रा.काँ.चे युवक जिल्हाध्यक्ष वैद्यकीय पथक घेवून पूरग्रस्तांच्या मदतीला जाणार (व्हिडीओ)

ravindra patil

जळगाव, प्रतिनिधी | राज्यातील कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि जि.प. सदस्य रवींद्र पाटील यांनी पुढाकार घेतला असून आज (दि.१०) सायंकाळी ते डॉक्टरांच्या टीमसह मदत घेवून तिकडे रवाना होत आहेत.

 

त्यांनी स्वत: आपले जि.प. सदस्य म्हणून मिळणारे एक वर्षाचे मानधन पूरग्रस्तांना दिले असून जिल्ह्यातील सगळ्या तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षांना आपापल्या तालुक्यातून शक्य तेवढी मदत गोळा करून पाठवण्याचे आवाहन केले आहे. गोळा होणाऱ्या रकमेतून ते औषधांचा साठा खरेदी करणार असून इतर साहित्यासह औषधे व उपचारासाठी जिल्ह्यातील पाच डॉक्टरांचे पथक सोबत घेवून ते आज सायंकाळी कोल्हापूर, सांगलीकडे रवाना होणार आहेत.

 

 

Protected Content