जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या ६५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा डोक्याला गंभीर दुखापास झाल्याची घटना घडल्यानंतर उपचारानंतर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
lजिल्हा पेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल असलेल्या ६५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा रविवार १४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत झालेल्या अनोळखी व्यक्तीची नातेवाईकांनी ओळख पटवावी असे आवाहन जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी केले आहे. 1या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक बापू बडगुजर करीत आहे.