चाळीसगाव येथील जि.प. शिक्षकाचा अकस्मात मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रेल्वे स्टेशन रस्त्याकडे जात असतांना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास एका 42 वर्षीय शिक्षकाचा अचानक खाली पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रस्त्यावर पडल्याचे लक्षात आल्यानंतर नागरीकांनी त्यांनी बाजूला घेवून तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाला होता. सोबत असलेल्या बँगेत आधारकार्ड आणि इतर कागदपत्रांद्वारे त्यांची ओळख पटली असून संभाजी उपरावगीर गोसावी रा. पोहोरे ता. चाळीसगाव असे त्यांचे नाव असून ते जिल्हा परिषदचे शिक्षक असल्याचे कागदपत्रावरून समजले.

 

याबाबत माहिती अशी की, शहरातील रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या मानसिंग मार्केट परीसरात आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास पायी जात असतांना संभाजी उपरावगीर गोसावी हे अचानकपणे रस्त्यावर पडले. ते पडल्याचे काही नागरीकांनी पाहिल्यानंतर त्यांना तातडीने रस्त्याच्याकडेला नेले. त्यांची नाडी आणि श्वासोच्छवास तपासले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. नागरिकांनी त्यांच्याजवळ असलेली बॅग पहिली असता त्यांचे नाव संभाजी उमरावगीर गोसावी रा.पोहोरे, ता.चाळीसगाव असून ते जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असल्याचे समजले आहे. दरम्यान, त्यांच्याजवळ वैद्यकीय उपचाराची फाईल मिळून आली असून ते वैद्यकीय कामानिमित्त आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शहर पोलिसांनी धाव घेत तात्काळ मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला.

Add Comment

Protected Content