सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने राज्यभर 24, 25 सप्टेंबर जिल्हास्तरीय कामबंद आंदोलन व 26 सप्टेंबर पासून आझाद मैदान मुंबई येथे मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात रावेर तालुका कोतवाल संघटनेमार्फत तालुका स्तरावर नायब तहसीलदार संजय तायडे यांना दिनांक २३ सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले.यावेळी रावेर तालुका कोतवाल संघटना अध्यक्ष सचिन कोळी,तालुका उपाध्यक्ष गणेश चौधरी,तालुका संघटना मार्गदर्शक विनोद अटकाळे, प्रविण धनके, विकास माळी, सिद्धांत लोखंडे, महेंद्र चौधरी, सचिन राठोड, तुषार चौधरी,गोपाळ बेलदार, प्रेमचंद पवार,रवि पाटील, जाकीर तडवी, महिला प्रतिनिधी माधुरी महाजन,निशा तडवी,नयना अवसरमल, आशा वाघ सोबत तालुक्यातील सर्व कोतवाल बांधव उपस्थित होते.
चतुर्थ श्रेणी देण्याची ऐतिहासिक मागणी पूर्ण व्हावी अशी कोतवालांची अपेक्षा आहे. याबाबत शासनाने लक्ष न दिल्यास 26 सप्टेंबर पासून आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील सर्व कोतवाल या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.