Home Cities जळगाव जिल्हास्तरीय लोकशाही दिन सहा सप्टेंबरला होणार ऑनलाइन

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सहा सप्टेंबरला होणार ऑनलाइन

0
42


जळगाव प्रतिनिधी । जिल्हाधिकारी कार्यालयात येत्या सोमवार 6 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 11 वाजता लोकशाही दिन ऑनलाइन होणार आहे.  

नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भावआहे. त्याचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीत तालुका, जिल्हाधिकारी, महानगरपालिका व विभागीयस्तरावर लोकशाही दिन दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (video Conferancing) आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. 

त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिन 6 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (Video Conferancing) होणार आहे. ज्या नागरिकांच्या काही तक्रारी असतील त्यांनी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयात उपस्थित राहून तक्रारी मांडाव्यात, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

 


Protected Content

Play sound