भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथे राष्ट्रीय वनस्पती स्वास्थ्य प्रबंधन संस्था हैदराबाद, कुषी विज्ञान केंद्र व कुषी विभाग जळगाव,व श्री गिरणाकाठ शेतकरी उत्पादक कंपनी भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने निर्यातक्षम केळी उत्पादन व फळमाशी नियंत्रण या विषयावर केळी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.


यावेळी जिल्हा कुषी अधिकारी कुरबान तडवी, वैज्ञानिक अधिकारी हैदराबाद, डॉ. चंद्रशेखर गुप्ता, अपेडाच्या झोनल मॅनेजर प्रणिता चौरे नाबार्ड जिल्हा व्यवस्थापक अमित तायडे, अपेडा चे मुंबई उपव्यावस्थापक प्रशांत वाघमारे, विठ्ठलगंगा शेतकरी उत्पादक कंपनी माढाचे अध्यक्ष धनराज शिंदे, पाचोरा कुषी उपविभागीय किशोर मांडगे, कुषी विज्ञान केंद्राचे डॉ हेमंत बाहेती, शास्त्रज्ञ किरण जाधव, भडगाव कुषी अधिकारी आर.एन.जाधव, श्री गिरणाकाठ शेतकरी कंपनीचे अध्यक्ष विनोद बोरसे उपस्थित होते.


