जळगाव (प्रतिनिधी) । पिडीत शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकरी व कुटुंब आणि गाळेधारक यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जळगाव जिल्हा जनजागृती मंचच्या वतीने शहरातील विविध संघटना आणि पदाधिकारी यांनी एकत्रित येवून शहरातील जी.एस.मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ‘जनआक्रोश फाशी मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी जिल्हावासियांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
अशा आहेत मागण्या
शेतकऱ्यांना बिनव्याजी राष्ट्रीयकृत बँकींगमधून सहज कर्ज पुरवठा आखल्या जावून त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी, प्रत्येक सिमांत शेतकऱ्यास जोडधंदा निर्माण करून देण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी, कर्जबाजारी शेतकऱ्यांकरीत मानसशास्त्रीय, अर्थविषयक सत्ता सरकारी उपाययोजना विषयक मार्गदर्शन केंद्राची निर्मिती करण्यात यावी, 2006 पासून आत्महत्याग्रस्त शेतकरी प्रकरणांची फेरतपासणी व्हावी, ती प्रकरणे पात्र करून कुटुंबियांना नुकसान भरपाईस मदत निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या पालनपोषणाची व शैक्षणिक खर्चासह पुर्नवसनाची संपुर्ण जबाबदारी शासनाने घ्यावी. जळगाव शहरातील गाळेधारक आणि फेरीवाले यांचा प्रश्न तात्काळ सोडवाव्या. यासह इतर विविध मागण्या दिलेल्या निवेदनात नमूद केल्या आहेत.
निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या
प्रा.डॉ. आशिष जाधव, ईश्वर मोरे, शिवराम पाटील, उमाकांत वाणी, अमोल कोल्हे, प्रतापराव पवार, आबासाहेब गरूड, उत्तमसिंग निकुंभ अर्जुनराव मांडोळे, अनंत निकम, डिगांबर बडगुजर, प्रा. विश्वासराव पाटील, डॉ. जे.एन.निमकर, रूपाली शर्मा, अनिल नेटकर, चंद्रकांत महाजन, धर्मेश पालवे, प्रदिप साळी, रोहित चौधरी, संजय निकम यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.