एकलव्य संघटनेची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त

पाचोरा प्रतिनिधी । जिल्ह्यातील एकलव्य आदिवासी संघटनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून येत्या १५ दिवसात नविन कार्यकारणी जाहीर करणार असल्याचे एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा नाशिक येथील म्हाडाचे चेअरमन शिवाजीराव ढवळे यांनी भ्रमणध्वनी द्वारे बोलतांना सांगितले. 

जळगांव जिल्हा हा मोठा असल्याने या जिल्ह्यातील गरीब, व सर्वसामान्य माणसाला पूरेसा न्याय दिला जात नव्हता, जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ असल्याने पुढील १५ दिवसात नविन दोन जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती केली जाणार असल्याचेही शिवाजीराव ढवळे यांनी सांगितले. यामुळे आजपासून जळगांव जिल्हयात एकलव्य संघटनेची जिल्हा कार्यकारिणी नसल्याचे सुचक     वक्तव्य त्यांनी जिल्ह्यातील समाज बांधवांना माहिती मिळावी यासाठी भ्रमणध्वनी द्वारे कळविले आहे. समाजातील नागरीकांना न्याय मिळवून देण्यासाठी होतकरू व चांगल्या चेहऱ्यांना काम करण्याची संधी  दिली जाणार असल्याचेही शिवाजीराव ढवळे यांनी सांगितले.

 

Protected Content