रावेर, प्रतिनिधी | आगामी काळात साजरा होणारे मोहरम व गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी आज येथील सौ. कमलाबाई कन्या विद्यालयाच्या जिमखाना हॉलमध्ये तालुका शांतता कमिटीची बैठक जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी या बैठकीत ध्वनी प्रदुषण नियंत्रण अधिनीयम तसेच ध्वनी प्रदुष्ण (नियमन आणि नियंत्रण) नियमाचे काटेकोरपणे पालन करणे, वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही महावितरणने मोहरम व गणेशोत्सव कालावधीमध्ये अखंड विद्युत पुरवठा करणे, तसेच गणेश मंडळे विद्युत तारेवर आकडे टाकुन, अवैध धोकादायकरित्या विद्युत जोडणी करणार नाहीत, याची दक्षता घेणे, बांधकाम विभाग, नगरपालिका, सर्व ग्रामपंचायती यांनी विसर्जन मार्गावरील रस्त्यांची डागडुजी करुन रस्त्यावरील विद्युत दिव्यांची व्यवस्था करुन विसर्जन विहिरी, या ठिकाणी लाईटची सोय करणे, त्या ठिकाणी स्वच्छता ठेवणे, विसर्जन ठिकाणी अप्रिय घटना घडु नये म्हणुन पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करणे, आपत्ती व्यवस्थापनाचे पथक सतर्क ठेवने, सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या मोकाट जनावरांची व्यवस्था करणे, गणेश मंडळे यांनी आक्षेपार्ह देखावे न करणे, प्रत्येक गणेश मंडळाने मंडपाच्या दर्शनी भागावर एक फलक लावून त्यावर स्वयंसेवकांची नावे व संपर्क क्रमांक लिहिणे,देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या महिलांच्या सुरक्षीततेसाठी स्वतंत्र रांगा लाउन तिथे मदतीसाठी स्वयंसेवकांची नेमणुक करणे, मोहरम व गणेशोत्सव दरम्यान सर्व नागरिकांनी सतर्क राहणे, कोणी धार्मीक भावना दुखावणार नाहीत किंवा सुरक्षीततेचा प्रश्न निर्माण होईल, अशा अफवा पसरवु नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटाके, फैजपूर प्रांताधिकारी अजीत थोरबोले, फैजपूर विभागधिकारी नरेंद्र पिंगळे, रावेर तहसीलदार उषारणी देवगुणे, रावेर नगराध्यक्षक दारा मोहम्मद, मुख्यधिकारी रवींद्र लांडे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, उद्योजक श्रीराम पाटील, प्रल्हाद महाजन, सार्वजनिक गणेश मंडळ अध्यक्ष सुनील महाजन, उपनगराध्यक्ष असदुल्ला खान, नगरसेवक आसिफ मोहंमद, शारदा चौधरी, अॅड.एम.ए. खान, उधोजक श्रीराम पाटील, माजी नगराध्यक्ष हरीश गणवणी, डॉ.बी.बी. बरेला, विजवितरण कंपनीचे राहुल पाटील, कामगार नेते दिलीप कांबळे, शैलेंद्र अग्रवाल, पंकज वाघ, अरुण महाजन, पो.पा. संघटनेचे जितू पाटील, अशोक शिंदे, अॅड. योगेश गजरे, अॅड.एस.एस. सय्यद, बाळू शिरतुरे, गयास शेख, युसुफ खान, नगरसेवक अयुब पठाण, कालु पहेलवान, अ. रफीक, मेहमुद भाई, आरिफ शेख, गयासोद्दीन काजी, सरपंच हानीफ खान, अयुब खान, यांचेसह हिंदू मुस्लिम पंच मंडळ व शांतता समिती सदस्य तथा महिला दक्षता समिती सदस्या सौ. सुवर्णा भागवत, कांता बोरा, मेघा मैडम, तसेच गणेश मंडळ, मोहरम मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी केले तर आभार पोलिस उपनिरीक्षक देवरे यांनी मानले.