यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डांभुर्णी येथे जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बि.एन.पाटील आणि येथील ग्रामीण रुग्णालयास जिल्हा सरपंच परिषद संघटनेचे अध्यक्ष पुरूजीत गणेश चौधरी यांच्या हस्ते आरोग्य केंद्रात ऑक्सीजन पाईपलाईनचे उद्घाटन आज करण्यात आले आहे.
तसेच डांभुर्णी ग्रामपंचायत मार्फत १४ व्या वित्त आयोगा अंतर्गत प्राथमिकआरोग्य उपकेंद्रास २ ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरचे लोकार्पण जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले, आँक्सीजन काँन्सनट्रेटर आरोग्य उपकेंन्द्राला भेट देणारी डांभुर्णी ग्राम पंचायत ही जिल्ह्यातील पहीलीच ग्रामपंचायत आहे तर यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी “माझे कुटुंब माझी जबाबदारी”या अभियान बाबत माहिती दिली. तसेच डांभुर्णी जिल्हा परिषद मराठी शाळेचे उप-शिक्षक विनोद मनोहर सोनवणे यांना सन २०१९-२० चा जिल्हा शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार यावेळी जिल्हाआधीकारी व मुख्य कार्येकारी आधीकारी यांच्या हस्ते करण्यात आला.
देशभरात कोरोना महामारीने थैमान घातले असुन ही लढाई जिंकण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत त्यातच डांभुर्णी ग्राम पंचायतीचे सरपंच व सरपंच संघटनेचे जिल्हाअध्यक्ष पुरूजीत गणेश चौधरी यांची डांभुर्णी ग्राम पंचायतीमार्फत आरोग्य उपकेंन्द्राला आँक्सीजन काँन्सनट्रेटर भेट देण्याची संकल्पणा ही खरोखरच कौतुकास्पद आहे असे जिल्हाधीकारी डाँ.अभिजीत राऊत व मुख्य कार्येकारी आधीकारी बि.एन पाटील यांनी या प्रसंगी सांगीतले.
यावेळी यावल पंचायत समीतीच्या सभापती पल्लवीताई पुरूजीत चौधरी, जिल्हा वैद्यकीय आधीकारी डाँ.दिलीप पोटोडे. साहेब,प्रांतअधिकारी अजित थोरबोले,किनगाव प्राथमीक आरोग्य केंन्द्राच्या वैद्यकिय आधीकारी डाँ.मनिषा महाजन, सरपंच पुरूजीत चौधरी, तहसीलदार जितेंद्र कुवर, गट विकास अधिकारी डॉ.निलेश पाटील, तालुका वैद्यकीय आधीकारी डाँ.हेमंत ब-हाटे तसेच तालुक्यातील सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.