जिल्हा बँकेची ‘वन टाइम’ सेटलमेंट म्हणजे आ.भोळेंकडून अपयश दडपण्याचा प्रयत्न : डॉ.चौधरी

cab8a632 da4a 47df bac6 e0919afa7da4

 

जळगाव (प्रतिनिधी) आमदार राजूमामा भोळे यांनी जळगाव जिल्हा बँकेची ‘वन टाइम’ सेटलमेंट करून मनपाची एक कोटी ते बारा कोटी बचत केल्याचा दावा केला आहे. त्यांचा हा दावा म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर जळगावकरांच्या मतांवर डोळा ठेऊन दिशाभूलीचा सोपस्कार पार पाडण्याचा तसेच आपले पाच वर्षातील अपयश दडपण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका कॉंग्रेसचे डॉ.राधेश्याम चौधरी यांनी केली आहे.

 

डॉ.राधेश्याम चौधरी यांनी म्हटलेय की, ‘वन टाइम’ सेटलमेंट म्हणजे मेलेल्या वाघ समोर बंदूक धरून फोटो काढून आपले शौर्य दाखवण्यासारखा आहे. हे शहाणपण आमदार महोदयांना साडे चार वर्षे का सुचले नाही ? किमान सत्तेत येऊन एक वर्ष निघून गेल्यावर त्यांची झोप का उघडली ?एवढा उशीर का? असेही येत्या पाच महिन्यात हि कर्ज फेड होणारच होती. त्यासाठी वापरलेला निधी जणू काही आपणच खिश्यातून भरल्याचा आव आणला जात आहे. निधीही मनपाच्या बचती मोडून च दिला तर मग यात कोणते कर्तृत्व ? शहरातील जनता बेहाल रस्ते ,साफ सफाई ,खड्डे ,पाऊसामुळे त्रस्त असतांना ते सोडवण्यात आमदार साहेब ,मनपा सत्ताधारी अपयशी ठरलेत म्हणून जनतेची दिशाभूल करून लक्ष वळवण्याचा हा इव्हेंट पार पडण्याचा घाट आमदार साहेबांनी पार पडला. हा इव्हेंट म्हणजे ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ असल्याचा आव आणण्या सारखा प्रकार असल्याचे डॉ.चौधरी यांनी म्हटले आहे.

 

वन टाइम सेटलमेंट करतांना स्वतः संचालक असतांना ,बँकेचे चेअरमन व पालकमंत्री आपल्याच पक्षाचे संचालक असूनही किती सुट आमदार महोदय आपण मनपाला व पर्यायाने जळगाव करांना मिळवून दिली? जिल्हा बँकेकडे मनपाचे जवळपास दोन कोटी रुपयांचे लिंकिंग शेअर्स आहेत ,ते आपण आपल्या नेत्यान्च्या मदतीने कर्जाच्या रकमेत का नाही वळवून घेतले ? असा सवाल देखील डॉ.चौधरी यांनी विचारला आहे.

 

डॉ.चौधरी यांनी आमदार राजूमामा भोळे यांना आव्हान दिलेय की, त्यांनी या कर्जफेडी संदर्भात माझ्याशी जाहीर चर्चा बँकेचे प्रतिनिधी ,तटस्थ सी.ए. यांच्या उपस्थितीत करावी व जनतेला त्यांचा पराक्रम पटवून द्यावा. फक्त स्टंटबाजी ना करता हुडकोची कर्जफेड सरकारच्या मदतीने करून दाखवावी व जळगावच्या जनतेला मोठा दिलासा द्यावा. तसेच आपल्या आश्वासंनपुर्तीचा दावा सिद्ध करण्यासाठी त्यांनी आपला २०१४ च्या निवडणुकीचा जाहीरनामा,वचननामा सोबत आणून जाहीर चर्चेचे आव्हान मी नम्रपणे जळगाव करांच्या वतीने त्यांना असल्याचे देखील डॉ.चौधरी यांनी म्हटले आहे. एवढ्चे नव्हे तर, चाणाक्ष जळगावची जनता भूल थापांना बळी पडता येत्या निवडणुकीत त्यांना योग्य तो धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. कारण ‘ये पब्लिक है ,सब जाणती है’ असेही डॉ.चौधरी यांनी म्हटले आहे.

Protected Content