यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील पंचायत समितीच्या समग्र शिक्षा गट साधन केन्द्र शिक्षण विभागाच्या माध्यमातुन जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना चोपड्याचे आमदार लता सोनवणे व रावेरचे आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या प्रयत्नातुन प्राप्त झालेल्या साहित्यांचे वाटप आज १४ ऑगस्ट गुरूवार रोजी करण्यात आले. या साहित्यामध्ये सायकल व व्हीलचेअरचे साधन वाटप करण्यात आले.
यावल पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड होत्या तर या वेळी प्रमुख उपस्थित म्हणुन गट शिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा परिषद शिक्षक संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सैय्यद शफीक, केन्द्र प्रमुख कविता गोहील, केन्द्र प्रमुख लातिका पाटील होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रवीन्द्र पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार संदीप मांडवगार यांनी मानले.