Home Cities रावेर हर घर तिरंगा अभियानांतर्गत सावद्यात तिरंगा ध्वजाचे वितरण

हर घर तिरंगा अभियानांतर्गत सावद्यात तिरंगा ध्वजाचे वितरण


सावदा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हर घर तिरंगा अभियानांतर्गत सावदा येथील गांधी चौकात नुकतेच भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकीताई पाटील यांच्या उपस्थितीत भारती तिरंगा ध्वजाचे वितरण करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, हर घर तिरंगा अभियानांतर्गत सावदा येथील गांधी चौकात भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकीताई पाटील यांच्या वाढदिवसांनिमित्ताचे औचित्य साधत हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात करण्यात आली. त्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केतकी पाटील यांचा वाढदिवस साजरा केल्यावर पाऊस सुरू झाल्यामुळे श्री. विठ्ठल मंदिरात भारत माता की जय,वंदे मातरम्च्या घोषणा देत भारतीय तिरंगा ध्वजाचे उपस्थित महिला, व नागरिक यांना वितरण करण्यात आले.

या अभियानात भाजपा अध्यक्ष जितेंद्र भारंबे, शहर माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष सचिन बऱ्हाटे, सरचिटणीस संतोष परदेशी, महेश अकोले, शिवाजी भारंबे, नितीन खरे, गजानन भार्गव, बेटी बचाव बेटी पढाव च्या संयोजिका सारिका चव्हाण, माजी नगराध्यक्षा देवयानी बेंडाळे, माजी नगरसेविका रंजनाताई भारंबे, नंदाताई लोखंडे, लिना चौधरी, कार्यकर्त्या मंदाकिनी वारके, सिमरन वानखेडे, बूथ प्रमुख अतुल चौधरी, राकेश पाटील, महेश बेदरकर, पंकज बेदरकर, अनेक कार्यकर्ते, पत्रकार बंधू उपस्थित होते.


Protected Content

Play sound