पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा येथे आज रोजी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींचे निवासी शाळेत देविदास भिकन महाजन यांची कन्या दक्षता हिचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त त्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना पावभाजी मिष्ठांन भोजन, बिस्कीट, चिवडा, मोतीचुर लाडु तसेच विद्यार्थ्यांना ५० टी-शर्ट देण्यात आले.
पूर्ण कार्यक्रम हा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. योगेश रघुनाथ महाजन तसेच शाळेचे मुख्याध्यापक मनिष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळेस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष शिक्षक हेमंत महाजन यांनी केले. व आभार प्रदर्शन आर. एस. शेलकर यांनी केले. सर्व विशेष शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अनमोल सहकार्य केले.