शेवाळे येथे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील शेळावे येथील जि.प.प्राथ शाळेतील ६० विद्यार्थ्यांना पारोळा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक कैलास चौधरी यांनी उलन स्वेटर भेट दिले. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

जि. प. प्राथ. शाळा धाबे ता. पारोळा येथील मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व वरिष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील हे सोशल मिडीयाव्दारे व प्रत्यक्ष भेटीगाठीतुन समाजातील दात्यांकडुन गरीब आदिवासी बालक व ग्रामस्थ यांना विविध प्रकारे मदत मिळवुन देत असतात. हे उद्देश लक्षात घेवुन पारोळा नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक कैलास चौधरी यांनी शाळेच्या ६० विद्यार्थ्यांना या गारठणाऱ्या थंडीत उच्चप्रतीचे उलन स्वेटर आज भेट देवुन त्यांना मायेची ऊबसह मोठा दिलासा दिला आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून आदिवासी क्रांतीकारांच्या जीवन चरित्रांच्या परिचयाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते जांभुळ वृक्षांचे रोपण करण्यात आले. या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. या उपक्रमाला चित्रा साळुंखे, मुख्याध्यापक भुषण पाटील व सिद्धराज साळुंखे यांचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स. पारोळा शापोआ अधिक्षक चंद्रकांत चौधरी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष कपिल चौधरी, शेळावे केंद्र प्रमुख गोविंदराव मिस्तरी, विशेष शिक्षिका स्नेहल साळुंखे, भागवत चौधरी, ईश्वर चौधरी यांच्यासह आदी उपस्थित होते.

 

 

Protected Content