श्रीनाथ फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप

सावदा ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्रीनाथ फाऊंडेशनने गरजूंना मदत करण्याचा एक सुंदर उपक्रम राबवला आहे. आज बारी येथे आयोजित कार्यक्रमात, आदिवासी भागातील 50 गरजू विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले, ज्यामुळे त्यांना हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण मिळेल. या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे.

कार्यक्रमादरम्यान श्रीनाथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष अमोल (जीतू) पाटील, चंद्रकांत बुगले, धनराज बुगले, सागर काळे, निखिल सोनवणे, हर्षल चौधरी, धीरज बावस्कर, रोहित बोरणारे आणि मयूर सालुंके यांची उपस्थिती होती. संस्थेचा हा सामाजिक उपक्रम समाजातील गरजूंना मदतीचा हात देण्याचा एक आदर्श घालून देणारा ठरतो. अशा कार्यांमुळे समाजात सकारात्मक बदल घडून येतो.

Protected Content