Home Cities जामनेर जामनेर येथे शेतकऱ्यांना मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते फवारणी पंप वाटप

जामनेर येथे शेतकऱ्यांना मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते फवारणी पंप वाटप


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांना नफा ना तोटा या माध्यमातून कीटकनाशक फवारणी पंप वितरित करण्यात येत असून हे फवारणी पंप राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजमहल भागवत, उपसभापती वासुदेव घोंगडे, संचालक तुकडूदास नाईक, सुनील कलाल, अशोक भोईटे, प्रा. शरद पाटील, रामलाल नाईक यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कॉसमॉस कंपनीच्या फवारणी पंपाची किंमत मार्केट पेक्षा कमी दराने दिले जात असून एका पंपाची किंमत पंचवीस रुपये ठेवण्यात आली आहे. १००० फवारणी पंप वाटपच्या उद्दिष्ट असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या फवारणी पंपाचा लाभ घ्यावा असे आव्हान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजमल भागवत यांनी केले आहे


Protected Content

Play sound