एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधीच्या विशेष मोहिमेअंतर्गत सेंट्रल बँक ऑफ इंडिया या शाखेतर्फे फेरीवाल्यांना प्रत्येकी २० हजार रूपयांची दुसरे कर्ज वाटप करण्यात आले.
एरंडोल नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे व जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश यांच्या हस्ते अनिल महाजन शरद शिंपी नंदलाल वाणी अशोक शिंदे कैलास गायकवाड यांना कर्जाचे वितरण करण्यात आले. एरंडोल नगरपालिकेत ३५४ फेरीवाल्यांचे अर्ज भरण्यात आले. त्यापैकी २२२ फेरीवाल्यांना प्रथम कर्ज १० हजार रुपये वाटप करण्यात आले. योजनेमध्ये पथविक्रेतांना १० हजार रुपये एका वर्षासाठी बँकेमार्फत विनाकारण कर्ज मिळणार आहे. नियमित कर्ज परतफेड केल्यास ६० टक्के व्याज अनुदान व डिजिटल व्यवहार केल्यास कॅश बॅक मिळणार आहे. त्यासाठी पथविक्रेत्यांनी मुदतीत कर्ज फेड केल्यास बँकेकडून दुसऱ्यांदा २० हजाराचे कर्ज उपलब्ध होणार आहे. यासाठी पथविक्रेत्यांनी जास्तीत जास्त अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.