बोदवड प्रतिनिधी । आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील एणगाव जी.डी. हायस्कूल विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील, बोदवड पंचायत समिती किशोर गायकवाड, बोदवड तालुकाध्यक्ष उध्दव पाटील, दुध फेडरेशचे संचालक मधुकर राणे, कृउबा संचालक रामदास पाटील, एणगाव माजी सरपंच विनोद कोळी, सचिन बोंडे, महेंद्र बोंडे, त्र्यंबक खाचणे यांच्यास गावकरी, मुख्याध्यापक आणि विद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते.