पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

 

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील सातगाव (डोंगरी) तांडा येथील जि.प.शाळेत सेवा सप्ताह अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या, पेन आदी शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी जि.प.सदस्य मधुकर काटे, माजी उपसभापती अनिता पवार, ज्ञानेश्‍वर चौधरी, हिलाल पाटील, राजू बोरसे, माजी सभापती सिकंदर तडवी, शिक्षक वाघ, उमेश चव्हाण, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, ग्रा.पं.सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच यावेळी भुमीपुजन आणि विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळाही पार पडला.

Protected Content