दीपनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिपनगर येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून महामानवाला अभिवादन करण्यात आले.
ही उपक्रम सामाजिक कार्यकर्ते सागर सावळे, ग्रामपंचायत सदस्य विजय मालवीय, कुणाल सुरळकर, हरीषभाई सुरवाडे, कुलदीप वानखेडे, निलेश कांबळे, कुंजू गवई, आकाश सपकाळे व मित्रपरिवार यांच्या सहभागातून आयोजित करण्यात आलेला होता.
या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित कथन करून महामानवाला आदरांजली अर्पित केली करण्यात आली. या उपक्रमात सहभागी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रुप ग्रा.पं.निंभोरा कपिल वस्तूचे ग्रामविकास अधिकारी संजय भारंबे, जि.प.शाळा मुख्यध्यापिका तडवी मॅडम तसेच सह शिक्षिका वर्ग, सामाजिक कार्यकर्ते विक्रम प्रधान, ग्रा.पं सदस्य रमेश गायकवाड, गौतम बडगे, राहुल गवई, आकाश सुरळकर, प्रशांत दांडगे, स्वप्नील तायडे, भावराव सावळे तसेच गावातील नागरिकांची उपस्थिती होती.