पहूर, ता.जामनेर ( वार्ताहर ) जामनेर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाला असून लाभार्थी शेतकऱ्यांना मदतनिधी वाटपास सुरुवात झाली आहे. आपल्या खात्यावर निधी जमा करण्यासाठी शेतकरी बांधवांची मोठी गर्दी जिल्हा मध्यवर्ती बँकेत होत आहे.
राज्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट आहे, त्यामुळे सरकारतर्फे जाहीर झालेल्या मदतनिधीचे वाटप आता सुरु झाले आहे. येथील जिल्हा बँक शाखेत २४६१ लाभार्थ्याचे खाते असून १८३६ शेतकऱ्यांना आतापर्यंत निधीचा लाभ मिळाला आहे. उर्वरीत ६२५ प्रस्ताव प्रलंबीत आहेत. या शेतकऱ्यांनी त्रूटींची पुर्तता केल्यानंतर त्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार असल्याची माहीती शाखा व्यवस्थापक जे.एस. पाटील यांनी दिली आहे.