जळगाव प्रतिनिधी । शहरातील विसनजी नगरात असलेल्या हनुमान मंदीरात हनुमान जयंतीनिमित्त आज मंगळवारी सकाळी छावा मराठा युवा महासंघ विद्यार्थी आघाडीच्यावतीने भाविकांना प्रसाद म्हणून मोतीचुर लाडूचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या महामारीमुळे शासकीय नियमांचे पालन करून हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आज सकाळपासून सोशल डिस्टन्सिंग ठेवून भाविकांनी येवून हनुमान मंदीरात दर्शन घेतले. लॉकडाऊन च्या काळात अनेक गरीब व गरजू नागरीकांची हेळसांड होत असल्याने याची दखल घेत शहरातील छावा मराठा युवा महासंघ विद्यार्थी आघाडीच्या वतीने आज मंगळवारी विसनजी नगरातील हनुमान मंदीर परिसरात भाविकांसह गरीब व गरजू नागरीकांना प्रसाद म्हणून मोतीचुर लाडूचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी छावा मराठा युवा महासंघ विद्यार्थी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष किरण ठाकूर, किशोर पाटील, विजय बडगुजर, करण भगत, राहूल अहिरे, निरज फंडे, मयुर जोशी, रोहीत सपकाळे, कुणाल महाले, विशाल पाटील,सुमित पाटील आदींची उपस्थिती होती.



