फैजपूर येथे गरीब विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

daptar vatap

फैजपूर प्रतिनिधी । येथील प्रगती पथावर असलेली श्री लक्ष्मी नागरी पतसंस्था मार्फत नुकतेच म्युनिसिपल हायस्कुलमधील गरीब व हातकरु विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, पंतसंस्थाचे चेअरमन नरेंद्र नारखेडे व व्हा.चेअरमन मनोजकुमार पाटील, संचालक अनिल नारखेडे, विजयकुमार परदेशी, खेमचंद नेहते, अप्पा भालचंद्र, चौधरी यांच्याहस्ते गरीब व हातकरु विद्यार्थींना दप्तराचे वाटप करण्यात आले. यावेळी चेअरमन नरेंद्र नारखेडे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सतत व नियमित अभ्यास करावा. यामुळे आपले जीवनास नवीन चालना मिळत असते. भारताचा आदर्श नागरिक होण्यासाठी आणि सर्वजण विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी पतसंस्थेचे संचालक मंडळ महत्त्वाची भूमिका राबवित असते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक आर.एल.आगळे होते. तर प्रमुख पाहुणे सेवा निवृत्त आरएफओ व्ही.एम.पाटील हे उपस्थितीत होते. मुख्याध्यापक आगळे यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थी या मदतीचा सदुप्रयोग करावा असे आवाहन केले आहे. यावेळी शाळेचे पर्यवेक्षक संजय सराफ, महाले सर, वाय.एस.महाजन, राजपूत सर, डी.बी.महाजन व सर्व शिक्षकवृंदांसह विद्यार्थी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एन.पी.पाटील तर आभार निलिमा खडके यांनी मानले आहे.

Protected Content