Home धर्म-समाज यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पौष्टीक आहाराचे वाटप

यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पौष्टीक आहाराचे वाटप


यावल प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गरीब व गरजू चिमुकल्यांना पौष्टीक पोषण आहाराचे वितरण करण्यात आले. 

यावल येथील बोरावल रोडवरील नगरपरिषदेच्या जलकुंभ परिसरात राहणाऱ्या गोरगरीब आदीवासी वस्तीवर यावल तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने माजी महसुल मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आदीवासी बांधवांच्या चिमकुल्या बाळांना पौष्टीक पोषण आहार वाटप करण्यात आले. याप्रसंगी यावल नगर परिषदचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नगरसेवक प्रा. मुकेश येवले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. देवकांत पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष निवृत्ती धांडे, राष्ट्रवादीच्या महीला पदाधिकारी व्दारका श्रीनिवास पाटील, डॉ. हेमत येवले, गनी भाई, अय्युब खान, आरीफ खान, एजाज देशमुख, हाजी शेख फारूख, युवक राष्ट्रवादीचे गोलु माळी यांच्यासह आदी राष्ट्रवादीच्या कार्यंकर्त्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. दरम्यान लहान बाळांना पौष्टीक आहार वाटप करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या मनातील आनंद हा गगनाला मावेनासा झाला असल्याचे चित्र त्यांच्या प्रफुल्लीत चेहऱ्यावरून दिसुन आले.


Protected Content

Play sound