मुक्ताईनगरात मोतीचूर लाडूचे वाटप

मुक्ताईनगर प्रतिनिधी । शिवसेना शहर संघटक वसंत भलभले संचालक शिव भोजन केंद्र मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब जनतेला मोतीचूर लाडूचे वाटप करण्यात आले.

यावेळी शेकडो लोकांनी व परिवारांनी याचा लाभ घेतला. प्रसंगी वसंता भलभले व विशाल भलभले  हे उपस्थित होते.

दरम्यान, आज तालुक्यात आमदार चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस हा अतिशय उत्साहात साजरा करण्यात येत असून यानिमित्त विविध जनहितार्थ उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर कालपासूनच शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. राज्यातील प्रमुख नेत्यांसह जिल्ह्यातील मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व आज भल्या पहाटेपासूनच मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आल्याचे दिसून आले आहे.

 

Protected Content