Home Cities जळगाव छावा मराठा युवा महासंघ विद्यार्थी आघाडीतर्फे गरजूंना मास्क व बिस्कीटचे वाटप

छावा मराठा युवा महासंघ विद्यार्थी आघाडीतर्फे गरजूंना मास्क व बिस्कीटचे वाटप

0
64


जळगाव प्रतिनिधी । शहरातील छावा मराठा युवा महासंघ विद्यार्थी आघाडीच्या वतीने शहरातील रेल्वे मालधक्का परिसरात गरजूंना मोफत मास्क व बिस्किटचे वाटप करण्यात आले.

जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातलेले असताना प्रत्येकाचे बेरोजगारीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यात सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील छावा मराठा युवा महासंघ विद्यार्थी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष किरण ठाकूर यांच्यातर्फे कोरोना काळात गरीब व गरजू लोकांना मोफत मास्क व बिस्कीटचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी नीरज फळे वैभव कुलकर्णी मयुर जोशी सागर मोतीराळे, कृष्णा जमदाले, अमोल मोरे यांच्यासह आदी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound