वरणगाव प्रतिनिधी । शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रभरात शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रम राबवून साजरा करण्यात येत असून भुसावळ शहरासह तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच वरणगाव शहर शिवसेनेतर्फे शनिवार रोजी दुपारी 12 वाजता शिवभोजन केंद्र वरणगाव येथे गोड पदार्थ म्हणून मोतीचूर लाडूचे वाटप करण्यात आले.
बस स्थानक चौकातील शिवभोजन केंद्रावर 100 लाभार्थांसह बस स्थानक चौकात उपस्थित नागरिकांना देखील वरणगाव शहर शिवसेनातर्फे मोतीचूर लाडू वाटप करण्यात आले. शिवसेना वर्धापन दिनाच्या सर्व शहरातील नागरिकांसह शिवसैनिकांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर, उपजिल्हा संघटक विलास मुळे, अल्पसंख्यांकांचे उपजिल्हा संघटक सईद मुल्लाजी, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, सुभाष चौधरी, सुरेश चौधरी, सय्यद हिप्पीशेठ, अब्रार खान, साईचरण चौधरी, शिवभोजन केंद्राचे संचालक संतोष माळी, निलेश ठाकूर, हर्षल वंजारी, सागर वंजारी, दिपक पाटील, तुषार चौधरी, राहुल वंजारी, अतुल पाटील, कैलास पाटील, रोहित वंजारी, अब्बू खान, फरहान खान, शेख समीर, अझहर खान, निलेश काळे, विभाग प्रमुख राम शेटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.