बोदर्डे येथे खावटी किटचे वाटप

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील वंजारी खु: येथे आदिवासी विकास महामंडळ व यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने खावटी योजनेच्या अंतर्गत बोदर्डे येथे २३ व वंजारी खु: येथे ८२ खावटी किटचे सेनेचे जिल्हा प्रमुख व जि. प. सदस्य डॉ. हर्षल माने (पाटील) यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.           

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब पाटील हे होते,तर प्रमुख अतिथी म्हणून बोदर्डे गृप ग्राम पंचायत सरपंच भैय्या साहेब जितेंद्र गोकुळ पाटील, बापू आधार पाटील, राजेंद्र नामदेव पाटील, सुभाष भिमसिंग पाटील, जितेंद्र नामदेव पाटील, प्रविण( आप्पा) अशोक पाटील, नाना श्रीपत पाटील, गोरख प्रकाश भील आदी मान्यवरांसह आदिवासी महिला पुरुष उपस्थित होते. यावेळी आपल्या मनोगतात डॉ.हर्षल माने म्हणाले की तळा-गाळातील प्रत्येक समाजाला न्याय दिला गेला पाहिजे. 

याच भावनेतून महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशिल असून या खावटी किटच्या माध्यमातून उपासमारीची वेळ येणार नाही असे म्हटले, यापेक्षाही अधिक काही अडचणी आल्यास मी बाळासाहेब पाटील यांचे सोबत आहे, तत्परतेने अडचणी सोडविण्यासाठी मी वेळोवेळी प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली. बाळासाहेब पाटील म्हणाले की, या बोदर्डे-वंजारी दोन्ही गावां करिता विकास कामांना प्राधान्य देऊन भील्ल- राजपूत समाजाला न्याय दिला जाईल, याकामी आपला एकोपा अपेक्षित आहे त्या शिवाय आपल्याला विकासा पर्यंत पोहता येणार नसल्याचे स्पष्ट केले.                    

खावटी किट वाटप कामी बोळे तांडा आश्रम शाळेचे क्लस्टर्स संजय गोसावी, सहशिक्षक रविंद्र साळुंखे, संदिप पाटील, शरद भामरे, पांडुरंग चौधरी यांनी परिश्रम घेतले, तर सुत्रसंचलन व आभार शरद भामरे यांनी व्यक्त केले !

 

 

Protected Content