भुसावळ प्रतिनिधी । अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आज भुसावळ शहर काँग्रेस कमिटीतर्फे आदिवासी दलित बांधवांना मार्गदर्शन व मिठाई वाटप करण्यात आली.
सोनिया गांधी यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रविंद्र निकम, प्रदेश महिला सचिव अनिता खरारे, विवेक नरवाडे यांनी मार्गदर्शन केले. वाढदिवसानिमित्त दलित आदिवासी महिला व बालक पुरुष बांधवांना मिठाई वाटप करण्यात आली. याप्रसंगी शहर उपाध्यक्ष कलीम बॅग संतोष साळवे, विलास खरात, विजय चौगुले, भगवान मेढे, रवींद्र साळवे, महेंद्र महाले, सुखदेव सोनवणे, सलीम भाई मागासवर्गीय सेलचे सुनील झोरे, बाळू सपकाळे, सुनीता पवार, शेवंता राखुंडे, शहर सरचिटणीस शैलेश अहिरे इत्यादी असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.