Home Cities अमळनेर अमळनेरात यात्रेकरु भाविकांसाठी मोफत मठ्ठा वाटप

अमळनेरात यात्रेकरु भाविकांसाठी मोफत मठ्ठा वाटप

0
32

अमळनेर -लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील सद्गुरू सखाराम महाराज पालखी महोत्सवानिमित्त राजे संभाजी मित्र परिवार, शिरिषदादा फाउंडेशन यांच्या वतीने राजे संभाजी चौक(दगडी दरवाजा) येथे यात्रेकरु भााविकांसाठी मोफत थंड मठ्ठा वाटप करण्यात आले.

सालाबादप्रमाणे या वर्षी पालखी महोत्सवानिमित्त राजे संभाजी मित्र परिवार, शिरीषदादा फाउंडेशनच्या वतीने आमदार शिरिष चौधरी यांच्या हस्ते स्व.जितेंद्र बारी, स्व.गोपाल पाटील यांच्या प्रतिमेला पूजन करून मठ्ठा वाटपास सुरुवात करण्यात आली. प्रसंगी राजे संभाजी मित्र परिवाराचे सदस्य व शिरीषदादा फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 


Protected Content

Play sound