जळगाव, प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व ‘नजर फाउंडेशन’च्या वतीने पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते यांच्या पाल्यांसह गरीब, गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वितरणाचा कार्यक्रम मंगळवारी (दि.९ जुलै) सकाळी १०.०० वाजता कांताई सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व नजर फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शालेय साहित्य वितरण करण्यात येणार असून याकरिता नावनोंदणी करणार्या विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या व इतर शैक्षणिक साहित्य मान्यवरांच्या हस्ते मोफत देण्यात येणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमस्थळी सकाळी १०.०० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे, जिल्हा कार्याध्यक्ष शरद कुळकर्णी, जिल्हा संघटक भगवान मराठे, जिल्हा उपाध्यक्ष नरेश बागडे, शैलेश पाटील, परशुराम बोन्डे, सुनील भोळे, मुकेश जोशी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष दीपक सपकाळे, महानगर अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले आहे.