जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनी परीसर आणि नेरी नाका स्मशानभूमी परिसरातील पंचाळ समाजातील गरजू व्यक्तींना माजी नगरसेविका लीलाबाई सोनवणे यांच्याहस्ते आज मंगळवारी सकाळी गहू, तांदूळ आणि साखरेचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे रोजगार व उद्योगधंदे बंद पडले आहे. तर लहान मोठे व्यवसायिकांवर देखील मोठी संकटे निर्माण झाली आहेत. यात पांचाळ समाजावर देखील परिणाम झाला असून त्यांचे देखील दोन वेळेच्या जेवणाचे वांदे झाले आहे. हा बाब लक्षात घेवून माजी नगरसेविका लीलाबाई सोनवणे यांनी आज मंगळवारी शहरातील स्मशानभूमी परिसरातील पांचाळ समाज आणि रामेश्वर कॉलनीतील गरजूंना गहू, तांदूळ आणि साखर असे प्रत्येकी पाच किलोप्रमाणे साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. गेल्यावर्षी देखील नगरसेविका लीलाबाई सोनवणे यांनी गरीब व गरजूंना संकटाच्या काळात धावून मदत दिली होती. यंदाचे हे दुसरे वर्ष असून पुढे भविष्यात आपण गरीब गरजूंना कायम मदत करणार असल्याची माहिती नगरसेविका लीलाबाई सोनवणे यांनी दिली. यावेळी अनिल सोनवणे आणि अनुताई सोनवणे यांची उपस्थिती होती.