महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बोदवड येथे अन्न वाटप

बोदवड – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा आज १६ वर्धापन दिनानिमित्त बोदवड शहरात मतिमंदांना अन्न वाटप करण्यात आले.

व्यसनमुक्ती / मनोरुग्ण केंद्र या ठिकाणी असलेले रुग्णांना एक वेळाच जेवण देऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी एक आगळी वेगळी सोहळा 9 मार्च वर्धापन दिन साजरा केला . या ठिकाणी बोदवड शहरातील व तालुक्यातील मनसे प्रेमी यांनी सहभाग घेतला मनोरुग्णांना  एक वेळ जेवणाचे नियोजन करून असा संदेश तालुका वाशी यांना दिला व इतर लोकांनी पण असेच कार्य करून मनोरुग्णांना धैर्य द्यावं असे जनतेला उद्देश केले.

याठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मोहन माळी, करण गंगातीरे, संदीप पाटील, राहुल हिवराळे, दिलीप तेली, सतीश मोरे व अक्षय कवळकर  सह इतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Protected Content