जळगाव, प्रतिनिधी | राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जळगाव येथील जीनगर युथ क्लब या संस्थेतर्फे सामाजिक बांधिलकी जोपासत मन्यारखेडा येथे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जळगाव तालुक्यातील जि. प. शाळा मन्यारखेडा येथील विद्यार्थ्यांना पेन , पेन्सिल , रबर , वह्या , बिस्किट पुडा असे साहित्य वाटप करण्यात आले. प्रारंभी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जि. प. शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार होते. प्रमुख अतिथि म्हणून जीनगर युथ क्लबचे सदस्य डॉ. विजय साखला, सुनील पवार, पारस साखला, अनिल पवार, राजेश चव्हाण, निशा पवार, चैतन्य पवार उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक जगन्नाथ कोळी यांनी केले. सूत्रसंचलन तुषार सोनवणे यांनी तर आभार श्रीमती बागूल यांनी मानले. या उपक्रमाचे प्रकल्पप्रमुख म्हणून पारस साखला तर सह प्रकल्पप्रमुख म्हणून निशा पवार यांनी काम पाहिले. याप्रसंगी सेवानिवृत्त वायू सेना अधिकारी मोहन चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.