जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | इकरा एच. जे. थीम कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने जागतिक चिमणी दिनानिमित्त पक्ष्यांसाठी जलपेयासाठी मातीच्या भांड्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पाटील एस. ए. उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. चांद खान होते. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. तन्वीर खान यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. शेख हाफिज यांनी केले.
या उपक्रमात उपप्राचार्य डॉ. शेख वकार, डॉ. युसुफ पटेल, डॉ. इरफान शेख, डॉ. आमीन काझी, प्रा. काझी मुझ्झमील, डॉ. शेख फिरदौस, डॉ. कहकशा अंजुम, डॉ. अंजली कुलकर्णी तसेच अन्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.