यावल प्रतिनिधी । कॉंग्रेस कमेटीच्या अनुसुचित जाती विभागाच्या वतीने तालुक्यातील चिखली बु॥ येथील वाचनलयास राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पोलीस भरती पुर्व अभ्यासासाठीचे मार्गदर्शन पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे.
देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने काँग्रेस कमेटीच्या अनुसुचित जाती विभागाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकलाताई इंगळे व ह . भ .प . पुंडलीक महाराज यांच्या हस्ते गावातील युवकांच्या आपले उज्वल भविष्य घडविण्यासाठी पोलिस भरतीपुर्वी अभ्यासासाठी मार्गदर्शन पुस्तकांची भेट येथील स्वामी विवेकांनद वाचनायलयास देण्यात आली.
या प्रसंगी ह भ प पुंडलीक महाराज यांनी आपल्या कडुन युवकांनी वाचनातुन समाज प्रबोधनासह समाजहितच्या दृष्टीकोणातुन चांगले आणी विधायक उपक्रम राबवावी या करीता २१०० रूपयांची देणगी दिली याप्रसंगी चिखली बु गावातील तरुण मित्रमंडळच्या वतीने कॉग्रेसच्या अनुसुचित जाती जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकलाताई इंगळे यांचे आभार मानले तर हभप पुंडलीक महाराज यांचे आशीर्वाद घेतले यावेळी अभीषेक इंगळे , तुषार पाटील , दिपक पाटील , विशाल कोळी , चेतन पाटील यांच्यासह मोठया संख्येने तरुण उपस्थित होते.